सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' फुगे विकण्याचा प्रयत्नसोलापूर |

सोलापूर शहरातील होटगी रोड वरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांची जागरूकता समोर आली आहे. ईदगाह मैदानासमोर फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव पाकिस्तान पाकिस्तानचा झेंडा असलेली हिरवे व विविध रंगाचे फुगे विक्री करत होता. अनेक मुस्लिम बांधव हे आपल्या लहान मुलांना घेऊन नमाज पठणसाठी
ईदगाह मैदानात येतात. अनेकदा ही लहान मुलं फुग्यासाठी हट्ट धरतात. नमाज पठण साठी आलेलं मुस्लिम बांधव हे मुलांच्या हट्टासाठी फुगे विकत घेतात. गुरुवारी सकाळी नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांचा लक्ष फुगेवाल्यांकडे गेला. त्याकडे
असलेली फुगे ही पाकिस्तान देशाची होती, त्यावर पाकिस्तान लव असे लिहिले होते. सजग व जागरूक मुस्लिम बांधवानी ताबडतोब तैनात असलेल्या पोलिसांना माहिती दिली व फुगे वाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजय पवार ( रा पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

होटगी रोड येथील शाही आलमगिर ईदगाह मैदानावर पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री करणाऱ्या संशयित इसमास मुस्लिम बांधवानी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. नमाज सुरू होण्या अगोदर काही मुस्लिम बांधवाच लक्ष गेल्यावर फुगेवाल्याला पाकिस्तान समर्थनाचे फुगे का विक्री करत आहे असा जाब विचारला. हे फुगे किती जणांना विक्री केला असे विचारला असता, फुगेवाल्याची भांबेरी उडाली होती. हा फुगा एखाद्या मुस्लिम लहान मुलाने हातात घेतला असता, आणि त्याचे फोटो
किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले असते तर त्यावर मोठी टीका झाली असती. विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत फुगेवाल्याला ताब्यात घेतले आहे तर, जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील पोलिसांनी पाकिस्तान समर्थनार्थ असलेली फुगे विक्री करताना एका संशयित इसमास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments