तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ २७ जून रोजी पंढरपुरात येणार
 तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ २७ जून रोजी पंढरपुरात येणार आहे. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  आणि त्यांचे सहकारी विठट्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तसंच विठ्ठूरायाच्या दर्शनानंतर तुळजाभवानीचंही दर्शन घेण्यासाठी केसीआर आणि नेतेमंडळी जातील अशी माहिती बीआरएसचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली आहे. 

दरम्यान, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी २१ जून रोजी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत BRSमध्ये प्रवेश केला. २०२१ मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात प्रवेश केला.

Post a Comment

0 Comments