बार्शी | गुन्हे दाखल करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी

 

बार्शी |

शहर व तालुक्यामध्ये होत असलेल्या खोटे गुन्हयाबाबत त्यापूर्वी व त्यानंतर फिर्यादी,पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल सी.डी.आर.आणि पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज यांची तपासणी तसेच बार्शी शहरात अवैध व्यवसायामुळे होत असलेले गुन्हेगारीकरण यामुळे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करणे बाबत माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

मागील दोन-तीन वर्षभरापासून बार्शी शहर व बार्शी तालुका पोलीस स्टेशन पांगरी पोलीस स्टेशन आणि वैराग पोलीस स्टेशन या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल करणे चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. बार्शी शहर पोलीस स्टेशन आणि बार्शी तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी हे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे. असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या विरुद्ध आणि असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडणाऱ्या संघटित भ्रष्ट टोळी विरुद्ध तात्काळ कारवाई करावी. अशा गुन्हयांची सत्यता पडताळून असे गुन्हे तात्काळ निकाली काढून समाजातील सामाजिक काम करणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध लोकांच्या विरुद्ध त्रास देण्याच्या उद्देशाने जी अवैध व्यवसायिकांची गुंड लोकांची,राजकीय भ्रष्ट लोकांची आणि भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी,दलाल लोकांची साखळी तयार झालेली आहे. अशा खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्या तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा आणि खोटा गुन्हा दाखल करण्यापूर्वी काही दलाल मंडळी,भ्रष्ट राजकीय लोक,गुंड प्रवृत्तीचे लोक,अवैध व्यावसायिक व फिर्यादी यांचे आणि पोलीस स्टेशन मधील कर्मचारी-अधिकारी यांचे खोटा गुन्हा दाखल करण्यापूर्वीचे सीडीआर त्यानंतरचे सीडीआर आणि बार्शी शहर पोलीस स्टेशन,बार्शी तालुका पोलीस स्टेशन व इतर पोलीस स्टेशनच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज हे तात्काळ काढून पोलिसांची एक टीम व अन्यायग्रस्त नागरिकांची एक टीम यांनी संयुक्तरीत्या बसून सत्यता पडताळण्यासाठी तात्काळ एक कमिटी नेमावी असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे.

बार्शी तालुक्यामध्ये अवैध मटका,जुगार,दारू, वाळू, वेश्याव्यवसाय,रेशन धान्य,अवैध गौण खनिज उत्खनन,मुरूम,खडिक्रशर किंवा यासारख्या तक्रारी देणाऱ्या,शासनातील व प्रशासनातील भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे उद्देशाने त्यांचेवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत,याचा तात्काळ बंदोबस्त वरिष्ठ पातळीवरून व्हावा अशी विनंती निवेदन द्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी सह्या करून निवेदन देणारे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर,बालाजी श्रीरंग डोईकोगे,सरनिया दिवमापी,संतोष नानासाहेब कळमकर,दयानंद समाधान पिंगळे,नवाज सलीम मुलाणी,नंदकुमार अशोक बिकर,राहुल रामेश्वर कठो, स्वप्नील कन्टेवह,अमर बाबासाहेब पाटील,रामचंद्र वजु कुरुक,अक्षय हनुमंत,ज्ञानेश्वर पांडुरंग बळी,सुरेश पाटील,तुषार राव,जहाँगीर शेख, योगेश विसक शिडे,रवि राजेंद्र चव्हाण,अमर बाबु शेख,भांगे अतुल,शिंदे,सोनिया महादेव गायकवाड,मोहसीन तांबाळी,दादा साहेब पवार,संजीव नीलाई बारंगुळे,राऊत किशोर,नाश्व बिकी लक्ष्मण,अनिश दिपक वेले,वैशाली देवी यांच्यासह अनेक बार्शीतील महिला व पुरुष,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments