लक्ष्याचीवाडी येथील दोन शाळकरी मुले बेपत्ता ; तालुका पोलिसांनी केले हे आवहानबार्शी |

बार्शी तालुक्यातील लक्ष्याचीवाडी येथून इयत्ता आठवी व इयत्ता दहावीमध्ये शिकणारी २ मुले मॉडेल हायस्कूल या शाळेला जातो म्हणून गेली परंतु ती घरी परतली नाहीत. या घटनेची फिर्याद अनिता दादा भोसले (वय ३५) रा.लक्ष्याचीवाडी यांनी तालुका पोलिसात दिली आहे.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेला अविनाश दादा भोसले (वय १४)वर्ष व इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारा सुशांत सुभाष दोरकर (वय १६) वर्ष दोघेही रां. लक्ष्याची वाडी तालुका बार्शी  दोघेजण सकाळी दहा वाजता बार्शीतील मॉडेल हायस्कूल या शाळेत जातो म्हणून घरातून निघून गेलेले आहेत. ती मुले अद्याप पर्यंत घरी परतलेली नाहीत. तरी फोटोमधील नमूद मुलांचा शोध घेण्यात यावा मिळून येताच खालील संपर्क मो. नं. ८३२९९३७६११ वर संपर्क साधावा असे आवाहन बार्शी तालुका पोलीस स्टेशन यांच्याकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments