सोलापूर | सेवानिवृत्त डीवायएसपी सासर्‍याने केला सुनेवर अत्याचार ; गुन्हा दाखलसोलापूर |

 सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम सासऱ्याने मुलाच्या पत्नीवर म्हणजेच सुनेवर लैंगिक अत्याचार केला आहे. याबाबत पीडित सुनेने सासरा आणि पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांना जबरदस्त धक्का बसला आहे. पीडित सुनेला सासरा महाविद्यालयात शिक्षणासाठी ने-आण करत होता. मुलगा शिक्षक असल्याने मुलाने वडिलांवर पत्नीला कॉलेजला ने-आण करण्याची जबाबदारी सोपवली होती. या जबाबदारीचा गैरफायदा घेत सासऱ्याने सुनेवर अत्याचार केला आहे. अत्याचार करणारा सासरा हा सेवानिवृत्त डीवायएसपी आहे. पीडित सुनेने 12 जून रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त डीवायएसपीचा शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडितेचा गेल्यावर्षी रितीरिवाजाप्रमाणे मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. पीडिता ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यामुळे तिला महाविद्यालयात तिचे सासरे सेवानिवृत्त डीवायएसपी हे कधी चार चाकी गाडीत, तर दुचाकी गाडीवरून सोडत होते. कॉलेजला घेऊन जाताना आणि घरी आणताना सासऱ्याची वाईट नजर सुनेवर पडली.

ऑगस्ट 2022 मध्ये नराधम सेवानिवृत्त डीवायएसपी सासराने नात्याला काळिमा फासण्यासारखे कृत्य केलं. घरात एकट्याच असलेल्या सुनेवर अत्याचार केला आणि याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास घटातून हाकलून देण्याची धमकी दिली. त्यामुळे ही बाब पिडीत सुनेने कुणालाही सांगितली नाही. याचा
गैरफायदा घेत सासऱ्याने पुन्हा दुसऱ्यांदा सुनेवर अत्याचार केला.

पिडीत विवाहित महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितली होती. सासरे हे वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन वेळा बळजबरीने अत्याचार केला आहे. सर्व हकीकत पतीला सांगितली. पतीने पत्नीची बाजू घेण्याऐवजी उलट पीडितेला मारहाण करून माहेरी हाकलून दिले. त्यामुळे माहेरी
राहत असलेल्या पीडीतेला सासरच्या मंडळींनी पुन्हा नांदविण्यास नेलं नाही. याबाबत पीडित सुनेने पती आणि सासऱ्या विरोधात भा.द.वि. 376 (2) न, 354 (अ),।342, 323, 504, 506 प्रमाणे फिर्याद पोलिसांकडे केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हनपुडे -पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments