अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा; प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईनेच घेतला चिमुकल्याचा जीवसांगली |

अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा खळबळजनक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला आहे. या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव निर्दयी मातेने केला होता.

मात्र एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळल्या नंतर विटा पोलिसांनी कसून तपास करून खरा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात निर्दयी मातेसह प्रियकर विटा पोलिसांच्या ताब्यात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला आईनेच विहरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील लेंगरे गावात घडला आहे. मुलाची आई ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. ज्योती हीचे लग्न झाले असून तिला शौर्य हा सहा वर्षाचा मुलगा होता. ज्योती आणि रूपेश या दोघांना लग्न करायचे होते. परंतू या लग्नामध्ये चिमुकल्या शौर्यचा दोघांना अडथळा वाटत होता.

त्यामुळे दोघांनी निर्दयपणे त्याचा काटा काढायचे ठरवले. सहा मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली. तर इकडे रुपेशने शौर्यला दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. तक्रार दाखल झाल्यानंतर चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते.

दरम्यान विहिरीत चिमुकल्या शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासात ज्योती आणि रुपेश या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधाची माहिती पुढे आली.. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी शौर्यचा खून केल्याची कबुली दिली. सध्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने खानापूर तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments