घरी एकटी असलेल्या मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार ; बार्शी तालुक्यातील दुर्दैवी घटनासोलापूर |

 घरामध्ये एकट्या असलेल्या महिलेच्या घरात शिरून तिला लाथाबुक्क्यानी मारहाण करून तिघांकडून अत्याचार करण्याची घटना बार्शी तालुक्यातील एका गावात रविवारी सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडली. पीडित महिलेवर सोमवारी पहाटे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत.

यातील पीडित 30 वर्षीय विवाहित महिला घरामध्ये एकटीच असल्याचे पाहून तिघेजण आत शिरले. महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिने जिवाचा आकांत करत असताना बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आणि संशयित आरोपी पळून गेले..घरातील मंडळी आल्यानंतर पिडितेने संबंधीत प्रकार सांगितला. यानंतर तिला वैराग येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून सोमवारी पहाटेच्या दरम्यान महिलेची जाऊने सोलापूरच्या.शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे
रुग्णालय सूत्रांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत
या घटनेची नोंद आहे.

Post a Comment

0 Comments