दुःखद | पार्वती (काकू) चोबे यांचे दीर्घ आजाराने निधन


सिरसाव |

सिरसाव गावातील सध्याच्या घडीला सर्वात मोठे एकत्र कुटुंब निवृत्ती तात्या चोबे आहे. यांच्या कुटुंबीयांचा सर्वात मोठा आधार पार्वती निवृत्ती चोबे ( काकू) यांचे १४ मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. गेल्या वर्षभरापासून पार्वती काकू या दीर्घ आजाराने ग्रस्त होत्या. त्या सिरसाव ग्रामपंचायतच्या माजी ग्रामपंचायत सदस्य होत्या.

त्यांच्या पाश्चात पती, पाच मुले, सुना नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. पार्वती निवृत्ती चोबे यांना पाच मुले आहेत. विष्णू बारंगुळे हे बार्शीमध्ये नोकरी व्यवसाय निमित्त स्थायिक आहेत तर नागनाथ चोबे देवगाव येथे जिल्हा परिषदच्या शाळेत मुख्याध्यापक करतात. याशिवाय अण्णा चोबे, संजय चोबे व राजाभाऊ चोबे असे पाच सुपुत्र असून उद्योगव्यवसाय, शेती समाजकारण व राजकारण या सर्व क्षेत्रात चोबे कुटुंबीय आघाडीवर आहे.

पार्वती काकू यांच्या निधनाने सिरसाव गावांवर दुःखाचे शोककाळा पसरली आहे. सकाळी ठीक ९.०० वाजता राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तमाम सिरसाव जनतेच्या वतीने पार्वती काकू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments