सुभाषनगर येथील २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ; शहर पोलिसात नोंद


बार्शी |

बार्शी शहरातील सुभाष नगर येथील एका २८ वर्षीय युवकाने गोडवान मधील लोखंडी पोलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निल शरद नेवाळे वय २८ रा. सुभाषनगर, बार्शी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  मयताचा मित्र सचिन प्रताप नलावडे यांनी या घटनेची खबर शहर पोलिसात दिली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, बार्शी शहरातील इंडस्ट्रियल एरिया नंबर दोन येते श्रीकृष्ण इव्हेंट्स गोडाऊन येथे रात्री दहाच्या सुमारास मंडपाच्या पिवळ्या कपड्याच्या साह्याने आत्महत्या केली आहे, व्यवसायाने उमेश नेवाळे हे फोटोग्राफीचा स्टुडिओ चालवत होते. या घटनेची नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक मुळे हे करत आहेत अशी माहिती शहर पोलिसांच्या वतीने २० मे रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Post a Comment

0 Comments