बार्शी |
बार्शी शहरातील गोंदील प्लॉट येते २५ वर्षीय गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सलीम अजित मागेल वय २५ असे गळफास घेऊन मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मागेल हे त्यांच्या आई मुमताज समवेत गोंदिल प्लॉट येते भाड्याने राहत होते. सलीम हा मिस्तरी काम करून उपजीविका भागवत होता.
महेश नलवडे यांचे कुटुंबीय शेलगाव येथे शेतामध्ये गेले असता यांच्या घराशेजारी राहणारा नितीन पवार यांनी फोन करून सलीम मोगल यांनी राहत्या घरी पत्र्याच्या खोलीत लोखंडी पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सांगितले. या घटनेची खबर घरमालक महेश बाबुराव नलावडे (वय ३७) यांनी शहर पोलिसात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments