येरमाळा तत्त्कालीन सपोनि विनोद चव्हाण यांनाजन्मठेप ; पत्नीच्या खून प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ठोठावली शिक्षा



धाराशिव |

सन २०१८ मध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी सपोनि विनोद चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी धाराशिव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सन २०१८ मध्ये गाजलेल्या या खून खटल्याची पार्श्वभूमी अशी की, येरमाळा पोलीस स्टेशनचे तत्त्कालीन सपोनि विनोद चव्हाण यांचा विवाह २०१४ साली चौसाळा जि बीड येथील मोनाली शशांक पवार हिच्याशी झाला होता. लग्नानंतर सपोनि विनोद चव्हाण हे सतत पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून छळ व जाच करीत होते. तसेच हुंड्यात राहिलेले पाच लाख आण म्हणून मारहाण करीत होते. बाहेर जाताना घराला कुलूप लावून जाणे, ड्रेस घालू न देणे असा छळ पत्नीचा करीत होते.

२५ जानेवारी २०१८ रोजी विनोद चव्हाण आणि मोनाली
यांच्यात मोठा वाद झाला, यातून गोळी झाडून मोनालीची हत्या करण्यात आली. मुलीचे वडील शशांक पवार यांनी सपोनि विनोद चव्हाण यांनीच हत्या केल्याचा आरोप करून, येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये मर्डरची तक्रार दिली. यावरून सपोनि विनोद चव्हाण आणि त्यांच्या आई वडिलांविरुद्ध भादंवि ३०२, ४९८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची जिल्हा प्रमुख न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या समोर झाली. लग्नाच्या तीन वर्षानंतर मूल होत नसल्याने नैराश्यातून मोनालीने आत्महत्या केल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले पण सपोनि विनोद चव्हाण यांच्या जाचातून आणि छळातून हा प्रकार घडल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी सपोनि विनोद चव्हाण यांना जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र सपोनि विनोद चव्हाण यांच्या आई वडिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खून प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन काटेकर यांनी केला होता.

Post a Comment

0 Comments