माढयातील शेतकरीने आंब्याला दिले 'शरद आंबा' असं नाव; पवारांचं नाव आंब्याला का दिलं?सोलापूर |

 सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण मधील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत अडीच किलोच्या आंब्याचे उत्पादन केले आहे. गाडगे यांच्या बागेत अडीच किलो आंब्याची जवळपास 20 ते 25 झाडं आहेत आणि या आंब्याला 'शरद मँगो' म्हणजेच शरद पवार आंबा, असे नाव दिले आहे.

आंबा महोत्सवात येणारे ग्राहक शरद मँगोकडे अधिक आकर्षित होत आहेत. शरद आंब्याला अधिक मागणी करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी फळबाग योजना आणली होती. त्याच योजनेतून आम्ही 8 एकर शेतजमिनीत जवळपास 7 हजार केशर आंब्याची रोप लावली आहेत. या अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार म्हणजेच शरद मँगो, असे नाव दिले आहे.

अडीच किलोचा आंबा उत्पादन करण्यासाठी एकाच झाडावर कलम करून विविध प्रकारचे आंबे घेतले. त्यामध्ये केशर आंब्याच्या झाडावर विविध प्रयोग केले. होमिओपॅथीचे विविध औषधांचा वापर केला. देशात प्रथमच अडीच किलोचा आंबा उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना दाखवले, असे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी माहिती देताना सांगितले. राजेंद्र पवार आणि डॉ. वीरेंद्र कुमार पाटील यांच्या अथक परिश्रमाने पिकावर होमिओपॅथी औषधांचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि अडीच किलो वजनी आंब्याचे भरघोस उत्पादन केले. बारामती कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी आंबा महोत्सवाला भेट दिली. अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार यांचे नाव देत शरद मँगो, असे नामकरण केलं.

Post a Comment

0 Comments