सोलापूर वैराग बसमधून प्रवास करताना १ लाख ६५ हजार किमतीचे दागिने लंपाससोलापूर |

सोलापूर ते वैराग बस मधून प्रवास करत असताना एका महिलेचे १ लाख ६५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञानाने लंपास केले आहेत. ही घटना १ मे रोजी दुपारी तीन ते संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान प्रवास करत असताना घडली, अशा आशयाची फिर्याद शिवाजी पंढरी काकडे वय ५५ रा. ढोराळे ता. बार्शी यांनी वैराग पोलिसात दिली आहे. 

या घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीची मुलगी तृप्ती सचिन क्षिरसागर ही सोलापूर हुन वैराग कडे प्रवास करत असताना दीड तोळा वजनाचे नेकलेस किंमत ६५ हजार रुपये, ९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या किंमत ४५ हजार रुपये, व ११ ग्रॅम वजनाची झुबे किंमत ५५ हजार रुपये असा १ लाख ६५ हजाराचा सोन्याचा मुद्देमाल आज्ञात इसमाने चोरून नेला आहे याप्रकरणी वैराग पोलिसात भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments