६ कोटी रुपयांच्या निधीतून कुर्डूवाडी पोलीस स्टेशन नवीन इमारतीचे भूमिपूजन !



माढा |

माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले तालुका पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या बांधकामांसाठी सुमारे ६ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. याकामी आमदार संजयमामा शिंदे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. १४ हजार स्क्वेअर फुट बांधकामात हे अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त पोलीस स्टेशन उभे राहणार आहे.
शहरात सुसज्ज अशी इमारत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. पुढील काळात पोलिसांना राहण्यासाठी वसाहती निर्माण करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सामंजस्याने सर्वांना न्याय मिळावा, अशी सदिच्छा व्यक्त केली. समाजातील वाईट लोकांवर कारवाई करणे व चांगल्या लोकांचे संरक्षण करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी गुन्हा घडण्याआधी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे मत व्यक्त आमदार बबनदादा शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रम प्रसंगी सोलापूर ग्रामीणचे  पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, डी.वाय.एस.पी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहा.पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे तसेच पत्रकार, शहरातील नागरिक, इतर प्रमुख पोलीस अधिकारी, पोलीस खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments