मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन शरद पवारांची निवृत्तीची घोषणा!


मुंबई |

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र हा निर्णय त्यांनी मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शरद पवार म्हणाले, अनेक वर्षांपासून राजकारणात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या वयात मला हे पद भूषवायचे नाही. दुसरे कोणीतरी पुढे यावे असे वाटते. 

आता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हे पक्षश्रेष्ठींनाच ठरवावे लागेल. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पद न सोडण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय बदलण्याचे आवाहन करताना दिसत होते. यावेळी काही समर्थक आणि कार्यकर्तेही रडताना दिसले.

शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित काय म्हणाले ?
शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, आम्ही कुटुंबीय आणि पक्षाचे नेते एकत्र बसू. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. पक्षाच्या बैठकीत शरद पवार तुमच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतील, याची खात्री मी देऊ शकतो.

Post a Comment

0 Comments