प्रेयसीला मिळवण्यासाठी प्रियकराने केले चिमुरड्याचे अपहरण

 ठाणे |

 भिवंडीतील एका ३२ वर्षीय महिलेचे २७ वर्षीय तरुणाशी पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र तिचा विवाह दुसऱ्या तरुणाशी झाला होता. तरीही तिच्या प्रियकराने तिला त्याच्या सोबत राहण्याचा तगादा लावला. मात्र तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यामुळे चिडून त्याने तिच्या चार वर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला. मुलाचे अपहरण करून गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला नाशिक रेल्वे स्थानकावर भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अवघ्या १२ तासात अटक केली. रिपोन आकाश अली व्यापारी (२७) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिपोन हा मूळचा पश्चिम बंगालच्या कुजबिहार जिल्ह्याचा रहिवाशी आहे. तक्रारदार आयशा ही देखील तिथलीच रहिवाशी असून, या दोघात लग्ना आधीच प्रेमसंबंध होते. मात्र आयशाचा भिवंडीतील टेमघर येथील चाळीत राहणाऱ्या मोहम्मद अली फकीर या तरुणासोबत निकाह झाला. तेव्हापासून मोहम्मद अली आणि आयशा आपल्या चार वर्षीय मुलासह टेमघर परिसरात राहत आहेत. आयशाच्या प्रियकराने तिच्याकडे आपल्या मूळ गावी जाऊन संसार थाटू, असा तगादा लावला होता. मात्र ती त्याला नकार देत होती.

Post a Comment

0 Comments