सुर्डी येथे समाज मंदिरात बसतो म्हणून चुलत भावाला लाथा बुक्क्यांनी मारहाण ; दोघा जणांवर गुन्हा दाखलबार्शी |

बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे समाज मंदिरासमोर का बसतो असे म्हणत लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघाजणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद लक्ष्मण विठ्ठल शिंदे यांनी तालुका पोलिसांत दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. चे सुमारास मौजे सुर्डी, ता. बार्शी येथे फिर्यादी गल्लीतील समाज मंदिरात बसलो असता माझे चुलत भाऊ १ ) हणुमंत यशवंत शिंदे, २ ) धनराज यशवंत शिंदे दोघे रा.सुर्डी, ता. बार्शी यांनी तेथे येऊन मला तू या समाज मंदिरात का बसतो, तू इथे बसायचे नाही तुला लय माज आलाय, तुझं समाज मंदिरात येऊन बसायच नेहमीचचं चालू आहे असे म्हणून हाताने लाथाबुक्क्याने अंगावर ठिकठिकाणी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून लाकडी काठीने, दगडाने मला पाठीत, हातावर, डोकीत मारहाण करून मला जखमी केले आहे व पुन्हा तू इथे समाज मंदिरात बसलेला दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली. तालुका पोलिसात भादवी कलम ३२३, ३२४, ५०४,५०६  व ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments