धाराशिव |
सध्या देशात काही मंडळी कडून हिंदू -मुस्लिम वाद निर्माण करून, देश्याच्या धार्मिक व जातीय सलोख्याला तडा देण्याचे, विघटनवादी प्रयत्न सुरु असताना, लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जवळपास सत्तर लक्ष रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात येणाऱ्या मज्जिद बांधकामांचे शुभारंभ येथील मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडले. मुस्लिम धर्मीयांच्या मज्जिदीच्या बांधकामाचे शुभारंभ एक हिंदू मठाधीशांच्या हस्ते करून हिंदू- मुस्लिम सलोख्यासाठीचे आदर्श समाजापुढे ठेवले आहे.
जेवळी गावाचे १९९३ च्या भुकपंनंतर नंतर,शासनाकडून रीतसर संपूर्ण पुनर्वसन झाले आहे. यामुळे नव्या गावात मज्जिद नसल्याने येथील मुस्लिम बांधवांची हेळसांड होत होती. तात्पुरता उपाय म्हणून येथील प्रभाग एक मध्ये बसवराज पाटील हे राज्यमंत्री असताना आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहात सर्व धार्मिक विधी उरकण्यात येत होते. इमारत अपुरी पडत असल्याने आता या सभागृहाच्या शेजारीच जवळपास सत्तर लक्ष रुपये खर्चून सुसज्ज अशी नव्याने मज्जिद बांधण्यात येत आहे.
यासाठी येथे वक्फ बोर्ड औरंगाबाद अंतर्गत जामा मस्जिद कमिटी ट्रस्ट स्थापना करण्यात आली आहे. मज्जिद बांधकामासाठी मुस्लिम बांधवांकडून लोक वर्गणी गोळा करण्यात आली आहे. बुधवारी या मज्जिद बांधकामांची शुभारंभ येथील गुरु सिद्धेश्वर मठाचे मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मौलवी नासिर आलम रजवी (जेवळी), मौलवी जाकेर शेख (येणेगुर), येथील जामा मस्जिद कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष दस्तगीर बेग, उपाध्यक्ष मुबारक मुजावर, सचिव युनूस पठाण, सहसचिव इस्माईल शेख, कोषाअध्यक्ष मैनोद्दीन मुल्ला, नसरुद्दीन मुल्ला, नवाज मुल्ला, हैदर मुल्ला, ताजुद्दीन मुल्ला, सुलतान मुल्ला, सुलतान अत्तार, रोहित कारभारी, बंदेनवाज शेख आदीसह हिंदू मुस्लिम नागरिक उपस्थित होते.
0 Comments