मुंबई |
अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे उर्फी तिच्या कपड्यांमुळं चर्चेत असते. अनेकदा तिच्या या फॅशनसेन्समुळे तिला ट्रोल देखील करण्यात येतं. मात्र उर्फी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष नाही देत. उर्फी जावेद इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय असते. त्याचबरोबर आता ती ट्विटरवर देखील सक्रिय होत आहे.
सध्या उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीने किवी फळापासून बनविलेला ड्रेस परिधान केला आहे. याचा व्हिडीओ देखील तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
0 Comments