जुनी केस काढून घे असे म्हणत पांगरी येते एकाला लाकडी दांडक्याने मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखलबार्शी |

बार्शी तालुक्यातील पांगरी येथे दोन वर्षांपूर्वी केलेली केस काढून घे असे म्हणत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे, ही घटना २१ एप्रिल रोजी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान घडली आहे. या घटनेची फिर्याद प्रदीप दिलीप जानराव (वय ३७) याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगरी तील आंबेडकर चौकामध्ये फिर्यादीच्या स्वामी समर्थ फर्निचर दुकानासमोर घडली आहे. दोन वर्षांपूर्वी केलेली केस काढून घे असे म्हणत लाकडी दांडक्याने, लाथाबुक्याने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ऋषिकेश भगवान सोनवणे, सम्राट भगवान सोनवणे, शिवाजी चंद्रकांत गायकवाड व दीपक रोहिदास जानराव सर्वजण रा. पांगरी  या चौघाजणां विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२३, ३२४, ५०४,५०६ व ३४ पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments