सोलापूर | कौटुंबिक वादातून पत्नीचा उपटला कान; पतीला पोलिसांनी केले जेरबंद


सोलापूर |

 अक्कलकोट तालुक्यात कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नीचा कान उपटून काढल्याची घटना घडली आहे.अक्कलकोट तालुक्यातील उटगी गावात नवरा बायकोच्या घरगुती वादातून हा प्रकार घडला आहे.नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीचा कान धरून ओढल्याने फाटून बाजूला झाला आहे.नवऱ्याने रागाच्या भरात केलेल्या हल्ल्यात विजयालक्ष्मी जमादार या गंभीर जखमी झाल्या आहेत.अंबजप्पा जमादार असे मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे, दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. 

जखमी विजयालक्ष्मी हिला अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 325 कलमाअंतर्गत पती अबजप्पा जमादार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी अबजप्पाला केले अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments