साखरपुडा झाला असतानाही २० वर्षीय तरुणीचे प्रियकरासोबत पालायन ; सोलापुरात घडली फिल्मी स्टाईल घटना


सोलापूर |

दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना सोलापुरातून समोर आली आहे. याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.

सोशल मीडियावरील एका ॲपवरून एका २० वर्षीय तरुणीची तरूणासोबत ओळख झाली होती. विशेष म्हणजे या तरुणीचा दुसऱ्या एका तरुणासोबत साखरपुडा झाला होता. असे असतानाही संशयित आरोपीने पीडित तरुणीशी बोलत तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. 

साखरपुडा झालेला मुलगा चांगला नाही, त्याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण आहे असे सांगत त्या तरुणीला कारमधून कर्नाटकमध्ये पळवून नेले. याप्रकरणी सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments