'खमक्या धडक' साप्ताहिकाच्या लोगोचे विनोदी अभिनेता भाऊ कदम यांच्या हस्ते अनावरण


बार्शी |

बार्शी शहरातील मल्टीकोर क्रिएशनच्या कार्यालयास मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेते भाऊ कदम व सुप्रसिद्ध नाट्यनिर्माते राहुल भंडारी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी  कविवर्य रामचंद्र इकारे यांनी तयार केलेल्या  'खमक्या धडक' या साप्ताहिकाच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भाऊ कदम यांनी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या  मार्गदर्शनाखाली हे साप्ताहिक वेगळी ओळख निर्माण नक्कीच करेल व पत्रकारितेत नवे आदर्श निर्माण करेल असा विश्वासही व्यक्त केला. राहुल भंडारी यांनी 'खमक्या धडक'च्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गणेश शिंदे यांनी मल्टीकोर क्रिएशन कंपनीविषयी  आणि कार्यपद्धती विषयी माहिती सांगितली. ज्येष्ठ संपादक, माध्यम तज्ञ, डिजिटल मीडियास पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष तथा व्हाईस मीडियाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया, प्रोडक्शन हाऊस, बँकिंग यासह हॉटेल व्यवसायात हि कंपनी कार्यरत आहे. 'खमक्या इंडिया' हे डिजिटल पोर्टल असून सुमारे सहा लाख फॉलोवर असल्याची माहिती त्यांनी दिली.खमक्या धडक हे साप्ताहिक राज्यातील घडामोडींना उचित असे स्थान देणार असून अनेक नवनवीन प्रयोग अमलात आणून अनेक बाबींना समाजापर्यंत ताकतीने पोहचविण्याचा प्रयत्न असेल असे मत मुरलीधर चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी भाऊ कदम व राहुल भंडारी यांचा सत्कार  करण्यात आला.

यावेळी सुप्रसिद्ध नाट्यनिर्माते दिपक नलावडे, मल्टीकोर क्रिएशन संचालक मुरलीधर चव्हाण, अमित इंगोले, रोहन नलावडे यांच्यासह डिजिटल मीडिया संघटनेचे राज्य सदस्य सूर्यकांत दादा वायकर, कवी रामचंद्र इकारे,चित्रकार रवी सुतकर, भाग्यकांता सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुनिता गाडेकर, सहसचिव श्रद्धा धर्माधिकारी, पत्रकार अर्जून गोडगे, ओंकार हिंगमिरे, शशांक शिंगाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments