( फोटो ओळ - सुर्डी : पै.मोईल पटेलला 'श्री.भैरवनाथ केसरी' ची मानाची गदा देताना मान्यवर )
वैराग |
चैत्री महिन्यातल्या श्री.भैरवनाथ यात्रे निमित्त सुर्डी ता.बार्शी येथे जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. या मैदानात शिवराय कुस्ती संकुल (कुर्डूवाडी) येथे सराव करणारा मल्ल, कुस्ती सम्राट आस्लम काझी यांचा पठ्ठा पै.मोईन पटेल 'श्री.भैरवनाथ केसरी'चा मानकरी ठरला. अक्षय जगदाळे (अकलूज) या प्रतिस्पर्धी मल्लाला एकचाक डावावर पै.मोईन पटेलने चितपट करत हा मान मिळवला. विजयी मल्लास मानाची चांदीची गदा व रोख रक्कम 41 हजार रुपये इनाम म्हणून देण्यात आले.
सुर्डीच्या मैदामानात प्रथमच दिल्लीच्या मल्लांनी हजेरी लावली. पंचक्रोशीतील कुस्तीशौकीनांनी मैदान पाहण्यासाठी गर्दी केली होती. मैदानाचे उद्घाटन विक्रीकर आयुक्त प्रकाश शेळके, सर्जेराव शेळके, जलसंपदा अधिकारी बालाजी डोईफोडे, दत्तात्रय झाडे, प्रमोद शेळके यांच्या हस्ते झाले.
छोट्या मल्लांच्या कुस्त्यांची सलामी झडताच मैदानाची रंगत वाढली. तगड्या लढती मध्ये संतोष जगताप (अकलूज), अविनाश वडतीले (बार्शी), प्रविण घाडगे (बार्शी), प्रशांत चंदनकर (कुर्डूवाडी), सम्रान शेख (कुर्डूवाडी) विजयी ठरले. कोल्हापूर, माळशिरस, धाराशिव, बार्शी, माढा, अहमदनगर या भागातून मोठ्ठ्या संख्येने कुस्तीपट्टूनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. पंच म्हणुन वस्ताद ताजुद्दिन शेख, मारुती डोईफोडे, जुनेद शेख, शिवाजी डोईफोडे, महिबूब शेख, शब्बीर शेख, भागवत डोईफोडे, मतीन शेख यांनी काम पाहिले. समालोचन मोहसिन आत्तार यांनी केले.
0 Comments