सिरसाव येथील मेहुण्याला भाऊजीने बार्शी येथे केली मारहाण; बार्शीत गुन्हा दाखलबार्शी |

२० मार्च रोजी दुपारी ३ वा सिरसाव येथील मेहुण्याला भाऊजी ने दगड व बीट फेकून जखमी केले असून तलवार ही डोक्यात मारली आहे या घटनेची फिर्याद सागर नवनाथ मुके (वय ३०) रा. सिरसाव ता. परांडा यांनी बार्शी शहर पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बार्शी मध्ये चार चाकी गाडीचे भाडे घेऊन आले म्हणून फिर्यादीच्या मोठे भाऊजी अभिजीत भगवान जाधव रा. गवत गल्ली, बार्शी यांनी तू चार चाकी गाडी घेऊन बार्शीत का आला म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व डोक्यात तलवारीने मारून जखमी केले आहे. या घटनेनंतर फिर्यादीला ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  मेव्हण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊजी वर भादवि कलम  ३२३, ३२४, ५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments