माढा | १० हजाराची लाच घेताना तलाठी सहदेव काळे यांना रंगीहात पकडले ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



माढा|

शेत जमिनीची फोड करून विभक्त कार्यवाही करण्यासाठी व सातबारा उतारा देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच मागून हजार रुपये पहिला हप्ता घेणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडले आहे.

सहदेव शिवाजी काळे, वय ५४ वर्षे व्यवसाय नोकरी पद तलाठी सज्जा कार्यालय दहिवली ता. माढा जि. सोलापूर असे रंगेहात पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे तसेच त्यांचे नातेवाईक यांचे नांवे मौजे दहिवली ता माढा येथे सामाईक शेतजमीन असुन सदर शेतजमीनीची फोड करून विभक्त करण्याकरीता तक्रारदार यांनी सज्जा कार्यालय दहिवली येथे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जानुसार शेतजमीनीची फोड करून विभक्त करण्याची कार्यवाही करण्यासाठी व त्याबाबतचा ७/१२ उतारा देण्याकरीता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे रु ३५०००/- लाच मागणी करुन तडजोडीअंती रु ३००००/- स्विकारण्याचे मान्य करुन त्यातील पहिला हप्ता रु १००००/- रु लाच रक्कम त्यांचे राहते निवासस्थानी स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले..

ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार- पोलीस अंमलदार पकाले, जाधव, सण्णके, चापोशि सुरवसे, सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

Post a Comment

0 Comments