बार्शी | अट्टल मोटरसायकल चोरटा अटकेत; २५ मोटर सायकल जप्त करून ८,७५,०००/- रू चा मुददेमाल हस्तगत



बार्शी |
बार्शी शहर पोलीस ठाणे हददीत एक इसम मागील काही दिवसामध्ये हेल्मेट घालुन ओळख लपवुन मोटर सायकल चोरी करीत होता. त्या करीता गोपनिय बातमीदार नेमण्यात आले होते. तसेच संशयीतांचे हालचाली याद्वारे इसम नामे सत्यवान रामहरी भोसले (सिरसट) रा. पडसाळी ता. उत्तर सोलापूर हा मोटर सायकल चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. 

सदरचा आरोपी हा मोटर सायकल चोरी करणेसाठी बार्शी शहरामध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याचेवर पाळत ठेवली असता तो तेल गिरणी चौक बार्शी येथे मोटर सायकलवरून आला त्यावेळी त्याचा संशय आल्याने त्यास पकडून त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सत्यवान रामहरी भोसले (सिरसट) वय ३० वर्षे रा. पडसाळी ता. उत्तर सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे असलेल्या
मोटर सायकल बाबत चौकशी केली असता त्याने सदरची मोटर सायकल हि बार्शी एस. टी. स्टॅन्ड येथुन चोरल्याचे सांगितले. 

त्यामुळे त्यास अटक करण्यात येवुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतली. पोलीस कस्टडी रिमांड मध्ये त्याने बार्शी शहर, टेभुर्णी, सोलापूर तालुका, पंढरपुर शहर, सोलापूर शहर, नळदुर्ग उस्मानाबाद येथुन मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडे चौकशी केली असता त्याने फायनान्स कंपनीमध्ये रिकव्हरी अधिकारी असुन त्याचेकडे स्क्रॉपचा विभाग आहे. स्कॉपमधील गाडी विक्री करीत असताना तो सदरची गाडी हि स्क्रॉपची असल्याने तिला कागदपत्रे नाहीत परंतु तुम्हाला फायनान्सचे पत्र देतो असे सांगुन तो गाडीची विक्री करीत होता. तसेच तो त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर फायनान्सचे स्कॉप मधील मोटर सायकल विकणे असले बाबत स्टेटस ठेवत होता. सदर आरोपीकडून आजपावेतो २५ मोटर सायकल किंमत ८,७५,०००/- रू चा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. त्याच्याकडून आणखीन मोटर सायकल हस्तगत होण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी  जालिंदर नालकुल याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संतोष गिरीगोसावी, सहा. पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, सहा. पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, पोहेकॉ शैलेश चौगुले, पोना मनिष पवार, पोना  अमोल माने, पोना वैभव ठेंगल, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ अंकुश जाधव, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ अविनाश पवार,पोकॉ रवी लगदिवे, रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments