"रंगपंचमी साजरी करण्यामागचे विज्ञान"



बार्शी |


होलिकात्सव मध्ये नैसर्गिक ऋतू परिवर्तनाचे रहस्य दडलेले आहे, ऋतू परिवर्तनाच्या वेळी जे रोग उद्भवतात ते मिटवण्याचे फार मोठे रहस्य या उत्सवां मागे आहे. होली का उत्सव म्हणजे बरेच काही आपले हिताचे आहे.
 
उन्हाळ्यात सूर्याचे किरणे आपल्या त्वचेवर सरळ पडतात, त्यामुळे शरीरात उष्णता वाढते शरीरात उष्णता वाढल्याने लवकर राग येणे स्वभावात खिन्नता येणे अशा तक्रारी उद्भवू शकतात, म्हणून होळीच्या दिवशी रंगपंचमी दिवशी पळस आणि इतर नैसर्गिक फुलाचा रंग एकत्रित करून एकमेकावर उधळला जातो, जेणेकरून आपल्या शरीराची उष्णता शोषन्याची क्षमता वाढावी आणि सूर्याचा प्रखर किरणांचा त्याच्यावर विकृत प्रभाव पडू नये. 

सूर्याची सरळ प्रखर किरणे पडतात तेव्हा हिवाळ्यात साठलेला कफ पगळू लागतो कफ जठरातं येतो तेव्हा जठराग्णी मंद होतो. पळसाचे फुले मंदाग्णी निवारक आहेत, म्हणून पळसाच्या फुलापासून बनवलेल्या रंगाने होळी खेळली जाते.
 
पळसच्या फुलापासून पानापासून मुळापासून व पळसाच्या पानापासून बनवलेल्या पत्रावली व द्रोणात जेवण केल्याने कित्येक लाभ होतात. राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी कित्येक राज्यात आजही पळसाच्या पानापासून बनलेल्या द्रोणात व पत्रावळी मध्ये जेवण करण्याची पद्धत आहे राजस्थानमध्ये पळसाला खाकरा सुद्धा म्हणतात. आज काल कागदाच्या पत्रावळ्या व द्रोण मिळतात त्यापासून तो लाभ होत नाही . जो पळसाच्या द्रोण व पत्रावळीने होतो  पळसाच्या फुलापासून बनवलेले रंगाने होळी खेळल्याने शरीराच्या रोमकुपांवर असा परिणाम होतो की वर्षभर आपले रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते पळसाने यकृत मजबूत होते यकृत कमजोर पडल्याने कावीळ होते. 

तिच्यापासून रक्षण करतो जे पळसाच्या फुलापासून बनवलेल्या रंगाने होळी खेळतात त्यांना लवकर कावीळ होणार नाही मंदाग्णी सुद्धा होणार नाही, अशा पद्धतीची रंगपंचमी योगदान सेवा समितीमध्ये प्रत्येक रंगपंचमीला खेळले जाते व तिथेच पळसाच्या पानापासून व पुलापासून बनवलेला रंग सुद्धा मिळतो. असे योगदान सेवा समितीचे अध्यक्ष अश्विनकुमार आसलकर आमच्याशी बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments