ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण ठार ; कळंब पोलिसात गुन्हा दाखल


धाराशिव |

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आडसूळवाडी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे, ट्रॅक्टर चालकावर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडसुळवाडी, ता. कळंब येथील- नानासाहेब तुकाराम बिडवे हे दि. 24.02.2023 रोजी 20.00 वा. सु. भोगजी शिवार बाप्पासाहेब गोरोबा आडसुळ यांचे शेताजवळ रस्त्याने मोटरसायकल वरुन जात होते.दरम्यान ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर क्रं एमएच 25 एडी 0984 हा चुकीच्या दिशेने भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने नानासाहेब चालवत असलेल्या मोटर सायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात नानासाहेब हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे वडील- तुकाराम आश्रुबा बिडवे यांनी दि. 16.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 184, 134 अ ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments