डॉ. कुन्ताताई जगदाळे जीवनगौरव पुरस्काराचे रविवारी होणार वितरण ; 'हे' आहेत पुरस्काराचे मानकरी




बार्शी |

सोलापूर जिल्ह्यातील मानाचा समजला जाणारा डॉ. कुन्ताताई जगदाळे जीवनगौरव पुरस्काराचे रविवार दिनांक ५ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता कै. यशवंतराव चव्हाण ग्रंथ हॉल, शिवाजी कॉलेज कॅम्पस, बार्शी येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजा माने ( राजकीय विश्लेषक तथा माध्यमतज्ञ, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया प्रदेशाध्यक्ष) हे असणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन इतिहास अभ्यासक तथा सुप्रसिद्ध वक्ते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे तर जॉइंट सेक्रेटरी अरुणजी देबडवार हे असणार आहेत. 

डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्काराचे २०२२ व २३ चे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत. सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार शंकर उर्फ बापूसाहेब कोकाटे, कृषी क्षेत्रातील पुरस्कार तुळशीदास गव्हाणे, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्रा.डॉ. सुनील विभूते, बांधकाम उद्योजक क्षेत्रातील पुरस्कार प्रशांत पैकीकर, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डॉ.किशोर गोडगे, पत्रकारिता क्षेत्र चंद्रकांत करडे, शिक्षण क्षेत्र विजय भानवसे, कलाक्षेत्र मोहम्मद बागवान, क्रीडा क्षेत्र डॉ. प्रा. दत्तप्रसाद सोनटक्के यांना जाहीर करण्यात आले आहेत. 

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकाच्या वतीने अध्यक्ष सुरेश राऊत, उपाध्यक्ष शशिकांत गोडगे, सचिव सतीश राऊत, सहसचिव संतोष गुजरे, खजिनदार भारत खांडेकर यांच्या सर्व संचालक मंडळांनी केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. हेमंतकुमार शिंदे, बाळासाहेब गुंड, प्रा. प्रकाश पालके हे असणार आहे.

Post a Comment

0 Comments