"विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावरून चोरी गेलेला ट्रॅक्टर- ट्रेलर सह आरोपी अटकेत"धाराशिव |

धाराशिव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना भूम तालुक्यातील गोळेगाव येथे पारधी पिढीवर गेले असता, त्यांना पाहून एक इससम पळुन जाण्याच्या प्रयत्न करीत असताना आम्ही  त्यास त्याचे नाव  गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- भिमा उर्फ भिमराव  झुबंर काळे असे सांगितले  त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पिंपळनेर कारखाना येथुन एक ट्रॅक्टरचोरुन अणल्याचे सांगितले सदर ट्रॅक्टर बाबत विचारणा केली असता सदरचे ट्रॅक्टर हे तयाने घराचे पाठीमागे लावल्याचे सांगितले.

आरोपीस  ताब्यात घेउन ट्रॅक्टर च्या चेसीस नंबरची पाहणी केली असता सदर ट्रॅक्टर बाबत पोलीस ठाणे कुर्डवाडी जि. सोलापूर भा द सं कलम ३९४,३४  प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत माहिती  मिळाली  नमूद आरोपी व एक लाल रंगाचा महिंद्रा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर, दोन ट्रॅक्टरचे केशरी रंगाचे ट्रॉली असा एकुण ३ लाख  किंमतीचे ट्रॅक्टर व ट्रॅक्टर ट्रॉली पोलीस ठाणे कुर्डवाडी  येथील सहाय्यक पोलीस  निरीक्षक  बोधे यांचे ताब्यात दिले नमुद आरोपी कडून इतर आरोपी निष्पन्न करुन त्याचे कडुन गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच पो. स्टे  मोहळ जि. सोलापूर ग्रामीण भ.द.सं. कलम ३९७ सह आर्म ॲक्ट ३,७, २५नमूद आरोपी इतर गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे.

 सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव, पोउपनि- संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, महेबुब अरब यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments