"रणवीर राऊत यांच्या शुभहस्ते फपाळवाडी/कदमवस्ती येथील गाव अंतर्गत रस्ते कामाचे भूमिपूजन...."


बार्शी |

    
बार्शी तालुक्यातील फपाळवाडी/कदमवस्ती ग्रुप ग्रामपंचायत मधील लोकरे घर ते रामकृष्ण फपाळ घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे यासाठी १० लाख व कदम वस्ती येथील अनिल कदम घर ते भारत कदम घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे यासाठी ५ लाख मंजुर कामांचे भूमिपूजन सभापती रणवीर  राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

    
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत हे करत आहेत असे सभापती रणवीर राऊत यांनी सांगितले.

यावेळी अर्जुन फपाळ,संभाजी खांडेकर,जयवंत लोकरे, राजाभाऊ येताळे, रामचंद्र घाडगे, गौतम लोकरे, प्रकाश फपाळ, नारायण फपाळ, संतोष माहनवर, तात्या जाधव, रघुनाथ फपाळ, सोनु लोकरे तसेच गावातील इतर प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments