महावितरण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याला २२ हजाराची लाच स्वीकारताना अटक


लातूर |

एकीकडे जुनी पेन्शन चालू करा या मागणीसाठी प्रशासनातील कर्मचारी गेल्या दोन दिवसापासून संपावर आहेत. एकीकडे पगार वाढ पेन्शन या मागण्यासाठी शासकीय कर्मचारी संप करीत असतानाच महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला 22 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

मार्च ग्राहकाच्या सोलार इन्स्टॉलेशनच्या प्रोजेक्ट करिता टेक्निकल फिजिबिलिटी म्हणजेच तांत्रिक योग्यता देण्यासाठी
महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गोविंद तुकाराम सर्जे (वय ४६) पद सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय शहर क्रमांक पाच महावितरण लातूर यांनी तक्रारदाराकडून ३० हजाराची लाच मागितली तडजोडी अंती पंचा समक्ष त्यांनी २२ हजाराची लाच स्वीकारली याप्रकरणी सर्जे यांना लाचलुचपात विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कामी मार्गदर्शक डॉ. राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्र नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी पंडित रेजितवाड, पोलीस उपअधीक्षक अंटी करप्शन ब्यूरो लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील अन्वर मुजावर पोलीस निरीक्षक, भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो लातूर व एसीबी टीम यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments