शेजारी शेतात गेले व शेजारणीनेच घर फोडले ; घर फोडणाऱ्या महिलेला येरमाळा पोलिसांनी घेतले ताब्यात



येरमाळा |

 वडजी गावात एका शेजारणीने घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. शेजारी शेतात जाताच, शेजारणीने घरफोडी करून रोख रक्कम ५,००० ₹ व सुवर्ण, चांदीचे दागिने असा एकुण ६५,००० ₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता.येरमाळा पोलिसांनी चोरीचा छडा लावून शेजारणीस अटक केली आहे.

४ मार्च रोजी दुपारी ३.०० ते  ६.१५  वाजण्याचे दरम्यान संदीप लहु मोराळे रा.वडजी हे घराला कुलूप लावून शेतामध्ये कामानिमित्त गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा काडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम ५००० ₹ व सुवर्ण, चांदीचे दागिने असा एकुण ६५,००० ₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे गुन्हा भादवी कलम ४५४,३८० भा.द. सं. प्रमाणे दाखल आहे.

येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, यांनी एक पथक तयार करुन पोहेकॉ कपील बोरकर यांना मिळालेल्या माहितीवरुन सदर गून्ह्याच्या घटनास्थळांचे शेजारी राहणारी महिला नामे मनकर्णा नारायण मोराळे हिस दि. १२ मार्च ताब्यात घेवून तिच्या कडे विचारपुस करुन तिच्या घराची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल एक चांदीचा करदोडा, लहानमुलाची पिळ्याची सुवर्ण अंगठी, दोन लहान मुलाचे सुवर्ण बदाम, कानातील सुवर्ण झुबंर व लटकन, एक ६४ मण्याचे दोन मंगळसुत्र असलेले सुवर्ण पोत, एक वाळा, एक सुवर्ण अंगठी असा सर्व मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करुन सदर महिलेला रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगीरी पोलीस ठाणे येरमाळाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, पोलीस उप निरीक्षक आनंदराव वाठोरे, , पोलीस हावलदारकपील बोरकर, विशाल गायकवाड, महिला पोलीस हावलदार तस्लीम चोपदार, पोलीस अमंलदार शाहरुख पठाण, चालक निसार शेख यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments