बार्शी शहराचे नूतन पोलिस निरीक्षक म्हणून संतोष गिरीगोसावी यांच्याकडे पदभारबार्शी |

 शहर पोलिस ठाण्याचे सध्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची बार्शी तालुका पोलिस ठाणे येथे तात्पुरत्या स्वरुपात बदली करून त्यांच्या जागी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून संतोष गिरीगोसावी यांना पदभार देण्यात आला आहे यापूर्वी ही गिरीगोसावी यांनी बार्शी शहर पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे 

दि.४ मार्च २०२३ रोजी आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी गिरीगोसावी यांना पत्राद्वारे तात्काळ बार्शी शहर पोलिस ठाण्याला हजर राहण्याचे आदेश दिले.

Post a Comment

0 Comments