बार्शी | भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे यांची निवड


बार्शी | 

बार्शी शहरांमध्ये गेल्या चौदा वर्षापासून भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठान हे अविरतपणे काम करत आहे. या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर चव्हाण आहेत. सन २०२३-२४ या वर्षासाठी 'भाग्यकांता प्रतिष्ठान'च्या अध्यक्षपदी सुनिता गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी गणेश दिलीप शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाग्यकांताचे उपाध्यक्ष राजा माने यांनी केले बोलताना ते म्हणाले की, या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात, सामाजिक बांधिलकी बरोबर मानवी जीवनाला आकार देण्याचे काम ही संस्था करते. गेल्या ३२ वर्षापासून ब्युटीशियन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुनिता गाडेकर ह्या नक्कीच अध्यक्षपदाला न्याय देतील असेही ते म्हणाले. गणेश शिंदे हे गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत, त्यांनी विविध संस्थेमध्ये विविध पदावर महत्वपूर्ण जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.  यावेळी सहाय्यक उपनिबंधक उमेश पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

लवकरच भाग्यकांता प्रतिष्ठान ची कार्यकारणी घोषित करु असे अध्यक्ष व सचिव यांनी सांगितले. बार्शीतील नागरिकांनी भाग्यकांता सामाजिक सेवेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिष्ठानचे सदस्य म्हणून यावेळी युवा आर्टिस्ट रवी सुतकर, राज स्पोर्टचे संचालक संतोष गाडेकर, पत्रकार अर्जुन गोडगे यांना सदस्यत्व देण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंटिरियर डिझायनर अमित इंगोले यांनी केले.

Post a Comment

0 Comments