एम.आय.एम. खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेचे दहन करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक होळी साजरी



सोलापूर |

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यास राज्य शासन व केंद्र सरकारने मंजुरी दिली असताना एम. आय. एम. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हेतूपुरस्सर  छत्रपती संभाजीनगर नामांतरास विरोध दर्शविण्यासाठी उपोषण केले, या उपोषणामध्ये औरंगजेबाची प्रतिमा बाळगून उदो-उदो करण्यात आल्याचा संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. या नीच वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेचे दहन करून प्रतीकात्मक होळी करण्यात आल्याचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी सांगितले. 

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नामांतरास विरोध दर्शविणारे खासदार इम्तियाज जलील व औरंगजेबची प्रतिमा नाचवणाऱ्या धर्मांध वृत्तीचा प्रतिकात्मक होळी करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

 १९८८ पासून महाराष्ट्रातील जनतेची औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याची मागणी होती. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याची मागणी होती राज्य शासन व केंद्र सरकारने या मागणीस नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यास विरोध दर्शविण्यासाठी खासदार जलील यांनी आंदोलन केले होते. 

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष श्याम कदम, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, आकाश कदम, राम चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, विजय वाले, तेजस गायकवाड, महेश गिराम, अमोल सलगर, रमेश भंडारी, विजय बिल्लेगुरू, रुपेश कुमार कीरसावळगी, राजेंद्र माने, बबन डिंगणे, रमेश चव्हाण, शिवाजी यमगवळी, संजय मुळे, रवी किरण फुलारी, विश्वनाथ आमाने, नितीन होणमाने, प्रशांत एक्काड, मुन्ना कटारे, संजय काशिद, नवनाथ देठे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments