बार्शी |
बार्शी तालुक्यातील पुरी गावातील सोपल गटाचे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य खंडेराव पाटील, किरण झालटे, मारुती क्षीरसागर, सलिम मुलाणी, सचिव राहुल पाटील व दत्तात्रय पाटील यांनी विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा देत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
प्रसंगी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांना सोबत घेऊन करत असलेल्या विकास कामांमुळे प्रभावीत होऊन अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोरे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मदन दराडे, ज्येष्ठ नेते कुंडलिक गायकवाड, हनुमंत धस, नाना धायगुडे, रामभाऊ लाडे, वैभव शिंदे, रोहित लाकाळ तसेच इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
0 Comments