सोलापूर | आरटीओ चेक पोस्टची थकबाकी ८७ लाखांची; सील करायला आलेले कर्मचारी आश्वासन घेऊन परतले


सोलापूर |

सोलापूर राज्याला कर्नाटक व तेलंगाना राज्याची सीमा लागून आहे. सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चेकपोस्ट आहे. नांदनी ग्रामपंचायत हद्दीत हे चेकपोस्ट असल्याने ग्रामपंचायतीचा कर भरणे बंधनकारक आहे.पण उप प्रादेशिक कार्यालयाने जवळपास ८७ लाखांची थकबाकी न भरल्याने ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी थेट चेकपोस्ट सील करण्यासाठी आले होते. आरटीओ अधिकाऱ्यांनी मार्च पर्यंत मुदत मागून सीलची कारवाई टाळली आहे. शनिवारी सकाळी आरटीओ चेक पोस्टवर सीलची कारवाई होत असल्याने आरटीओ अधिकाऱ्यांत एकच धांदल उडाली होती. दोन तास मालवाहतूक वाहन तपासणीचे कामकाज ठप्प झाले होते.

२०१३ सालंपासून आरटीओ चेकपोस्टची थकबाकी आहे-
सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर नांदणी गावच्या हद्दीत २०१३ पासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चेकपोस्ट आहे. नांदणी गावच्या हद्दीत असल्याने ग्रामपंचायतीचे कर भरणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांपासून आरटीओ कार्यालयाने नांदणी ग्रामपंचायतीचे कर थकविले आहे. नांदणी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनी वेळोवेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांसोबत पत्रव्यवहार केला, तरीही नांदणी ग्रामपंचायतीचाकर भरला जात नाही, म्हणून शनिवारी ग्रामपंचायत अधिकारी व गटविकास अधिकारी थेट चेकपोस्ट सील करण्यासाठी आले होते.

आरटीओ प्रशासनाने मार्च नंतर भरण्याचे आश्वासन दिले-
आरटीओ चेकपोस्ट वर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली होती. चेकपोस्ट सील होईल या भीतीपोटी आरटीओ अधिकाऱ्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. उपप्रादेशिक कार्यालय सोलापूर येथून काही अधिकारी आले अन ग्रामपंचायत सदस्य,सरपंच, गटविकास अधिकारी यांची समजूत घालत होते.अखेर ८७ लाख २० हजार २०५ रुपयांची ग्रामपंचायतीची थकबाकी मार्च नंतर भरू असे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments