“डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल.”तुळजापूर |

डायल ११२ वर कॉल करून पोलिसाला खोटी माहिती देणारे इसमावर तामलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.१४.०३.२०२३ रोजी १९.१२ इसम नामे ज्ञानेश्वर अण्णासाहेब साळवे रा. मसला खुर्द ता. तुळजापूर यांनी डायल ११२ वर कॉल केला करुन सागितले की, “माझ्या घरासमोर माझ्यावर फायर केला व मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे” तामलवाडी पोलीस सदर ठिकाणी डायल ११२ गाडी सह गेले. नमुद इसमाकडे चौकशी केली असता.

सदर ठिकाणी काही एक घटना घडली नसल्याचे दिसून आले तसेच पोलीसांपा तो दारूच्या अमंला खाली असल्याचे
समजले त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याच्यावर पोलीसांना खोटी माहिती दिल्याने त्याच्यावर तामलवाडी पोलीसांनी
गुन्हा दाखल केला आहे. तरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जणतेस आवाहन केले आहे की डायल ११२ वर कॉल करून खोटी माहिती दिल्यास आपणावर प्रचलित कायद्याप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments