भाग्यकांता प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा
बार्शी |
स्त्री ही माता आहे, भगिनी आहे. कुटुंबाचा आधार आहे हा आधार सर्वांनी मिळून जपणे गरजेचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने नावलौकिक मिळवले आहे, बार्शी पंचक्रोशी येथील उद्योग व्यवसायातील महिलांचा सन्मान करायला मिळणे हे भाग्याची गोष्ट आहे, कुटुंबीयांचा सपोर्ट व संधी मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहते, असे प्रतिपादन उज्वलाताई सोपल यांनी व्यक्त केले. बार्शी शहरातील हॉटेल रामकृष्ण येथे उद्योग व व्यवसायात नावलौकिक कमावलेल्या २० महिलांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'भाग्यकांता सामाजिक प्रतिष्ठान'च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे उद्योग वय वर्षे ४ ते ६५ दरम्यान असलेल्या बालमहिला ते ज्येष्ठ महिला यांना सन्मानित करण्यात आले.
आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमलताई माळी यांचे शिक्षण दुसरी पास असून यांच्या ६०० पेक्षा जास्त कविता प्रकाशित झाल्या असून त्यांनी त्यांनी कवितेच्या माध्यमातून कार्यक्रमांमध्ये रंगत वाढवली. शिक्षण नसतानाही शेकडो कविता रुचून मुखपाठ असणाऱ्या विमलताईला म्हणूनच आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखले जाते. आज पर्यंत पुरस्कार खूप मिळाले पण माहेरच्या लोकांकडून मिळालेला हा पहिलाच पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन विमलताई माळी यांनी केले.
भाग्यकांता प्रतिष्ठानच्यावतीने २०२२-२३ चा जीवनगौरव पुरस्कार प्रिया ब्युटी पार्लरच्या कविताताई नेने यांना देण्यात आला. उद्योग व व्यवसायात योगदान देणाऱ्या बार्शी पंचक्रोशीतील मायरा जैन, मैथिली ब्युटी पार्लरच्या सुनिता गाडेकर, खंडेश्वर भेळ खांडवीच्या सुधामती बारंगुळे, फॅशन डिझायनिंग शोभा पल्लोड, इसेन्शियल डेकोर गुंजन व मीना जैन, गंधस्वा ड्रेसवाले सुगंधा आगवणे, चिंतामणी प्लांटरच्या नीलिमा रायचूरकर, अबॅकस क्लास रश्मी पूनमिया, डिझायनर केक स्पेशालिस्ट शितल भंडारी, धन्वंतरी ब्युटी पार्लरच्या ज्योती जावळे, लिटल स्कॉलर स्कूलच्या प्रमिला मठपती, होमस्केपच्या अंकिता चांडक, योगा व झुबा क्लास घेणाऱ्या दिपाली झालटे, फोटोग्राफीमध्ये नावलौकिक असणाऱ्या कोमल मंगरुळे, श्री गणेश वस्त्रदालन यांच्या मीनाक्षी यादव, स्टॅम्प व्हेंडर शहिदा बोहरी, नेहा फॅशन डिझाइनिंगच्या उल्का डोंबे, सुवर्णा मेडिकलच्या स्नेहल पाटील, ब्लॉसम ब्युटी पार्लरच्या नीलम अग्रवाल यांचा महिला दिनानिमित्त विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील उज्वलाताई सोपल, कल्पनाताई बारबोले, प्रतिभाताई चव्हाण व विमलताई माळी यांच्या हस्ते महिलांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला भाग्यकांताचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर चव्हाण, मल्टीकोरच्या संचालिका विमल इंगोले, सचिव विजय शिखरे, मल्टीकोरचे संचालक रोहन नलवडे, डिजिटल मीडियाचे राज्य कार्यकारणी सदस्य सूर्यकांत वायकर, अभिनेते अभय चव्हाण, मीना शिखरे, विभाताई नलावडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावना मल्टीकोरचे संचालक अमित इंगोले यांनी केली. तर सूत्रसंचालन धर्माधिकारी तर आभार प्रदर्शन गणेश शिंदे यांनी केले.
0 Comments