पुणे |
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 26 मार्चला घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी तब्बल एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला आहे. या सर्व उमेदवारांना त्यांच्या Log in मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उमेदवारांनी https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या 'लॉग इन'मधून आपला नोंदणी क्रमांक टाकून 26 मार्च 2023 पूर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे.
0 Comments