भूम | राळेसांगवी येथे तरुणाची आत्महत्या ; आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखलभूम |

भूम तालुक्यातील राळेसांगवी येथे २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघकिस आला आहे. राळेसांगवी, ता. भुम येथील- चैतन्य गोवर्धन धोत्रे वय २४ वर्षे, यांनी दि. १५ मार्च रोजी ४.०० वा. सु. राळेसांगवी येथे भरत टाळके यांचे शेतात गळफास घेउन आत्महत्या केली. 

गावकरी- सुर्यकांत टाळके, लक्ष्मण्‍ टाळके, संतोष टाळके, नमोद टाळके, सुमीत टाळके यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून चैतन्य यांने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील – गोवर्धन धोत्रे यांनी दि. १५ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम ३०६,५०४,५०६,३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments