माढा | उपसरपंचासह सहा सदस्यांनी दिले सरपंचाकडे राजीनामे ; सरपंचाच्या मनमानी कारभाराचा ठेवण्यात आला ठपकामाढा |

माढा तालुक्यातील पूर्व भागातील राहुलनगर ग्रामपंचायतीच्या उप सरपंचासह सहा सदस्यांनी सरपंचाकडे राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्या सहा सदस्यांनी सरपंच रोहन धुमाळ यांच्यावर मनमानीचा  कारभाराचा आरोप केला आहे. राहुलनगर ग्रामपंचायतीची सोमवारी मासिक बैठक सरपंच रोहन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. 

या बैठकीनंतर उपसरपंच उज्ज्वला दत्तात्रय शिंदे, सदस्य सुभाष विष्णू शिंदे, राजेंद्र हंबीरराव भुई, चंद्रकला प्रकाश गायकवाड, कल्पना अनिल शिंदे, वत्सला अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच रोहन धुमाळ यांच्याकडे सोपवले. यानंतर या सदस्यांनी सरपंच मनमानी कारभार करत असल्याने राजीनामे देत असल्याचे सांगितले

Post a Comment

0 Comments