"मुलीला पैसेवाला नवरा किंवा बॉयफ्रेंड हवा असतो पण..."


मुंबई |

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत असते. मराठी चित्रपटांसोबत तिने हिंदी चित्रपटात सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या. सिंघम आणि दिल चाहता हैया सारख्या चित्रपटात उत्तम व्यक्तिरेखा साकारली.

सोनाली आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवर कायम सक्रिय असते. सोनालीने एक वक्तव्य केलं ज्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. नुकत्याच एका मुलाखतीत तिने असं काही वक्तव्य केलं ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.

अनेक मुली आळशी आहेत. त्यांना एक असा नवरा हवा किंवा बॉयफ्रेंड हवा ज्याच्याकडे एक चांगली नोकरी असेल, घर असेल, ज्याचा पगार आणखी वाढणार असेल. इतकंच नाही तर मुलींमध्ये एवढी हिम्मत नाहीये की ती म्हणू शकेल मी लग्नानंतर आपल्या घरासाठी काहीतरी करेन, असं वक्त्व्य सोनालीने केलं.

ती स्वतःसाठी कमवू शकेल एवढी धमक तिच्यात नाही. सोनालीच्या या वक्त्यावरुन सोशल मीडियावर विरोध केला तर काहीजणांनी तिचं समर्थन केलं आहे. तिच्या या पोस्टवर युझरसने कमेंटस सुद्धा केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments