शासकीय कामात अडथळा ; देशमुखांसह ७ जणांना जामीन

सोलापूर |

पालकमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आले असताना नियोजन भवनात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांशी धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले जनहीत शेतकरी संघटनेचे प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्यासह ७ जणांच्या जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. मिलींद भोसले यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी सर्व ७ आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. 

पालकमंत्री नियोजन भवनात बैठकीसाठी आलेले असताना कांद्याच्या पडलेल्या भावा बाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी संघटनेचे भैय्यासाहेब देशमुख हे कार्यकर्त्या समवेत आले होते. त्यावेळी पोलिसांनी शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याबाबत आवाहन केलेले असताना देखील भैय्या देशमुख, किशोर दत्तु, ज्ञानेश्वर पवार, अंकुश वाघमारे, बजरंग रोडकर, मोहन
दत्तु, सोमनाथ लिगाडे यांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी करत
पालकमंत्री यांच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना
पोलिसांनी त्यांना मज्जाव केला होता. त्यांनी पोलिसांशी धक्काबुक्की केली. 

तसेच पालकमंत्री यांना कांद्याचा हार घालुन शाई टाकुन
अपमानीत करण्याच्या उद्देशाने शाई व कांद्याचा हार जवळ बाळगला. अशा आशयाची फिर्याद पोलीसातर्फे सागर सरतापे यांनी सदर बझार पोलीसात दाखल केली होती. याप्रकरणात आरोपींतर्फे अॅड. जवदीप माने, अॅड. प्रणित जाधव यांनी तर सरकारतर्फे अॅड. गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments