भोगावती नदीपात्रामध्ये वाळू पकडण्यासाठी महसूल टिम येताच मालक ट्रेलर जाग्यावरच सोडून झाला फरार ; १ लाख ७ हजाराचा मुद्देमाल जप्त


वैराग |

बार्शी तालुक्यातील काळेगाव येथील भोगावती नदीपात्रातून अवैद्यरित्या वाळूचा उपसा होत आहे अशी माहिती तहसीलदार सुनील शेरखाने यांना मिळाली, महसूल ची टीम वाळू माफियाला पकडण्यासाठी येत आहे अशी चाहूल लागतात डम्पिंग ट्रेलर जागेवर सोडून ट्रॅक्टरसह मालकाने धूम ठोकली आहे. वैराग पोलिसाच्या मदतीने एक लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

याविषयी सविस्तर माहिती अशी की, २ मार्च रोजी दुपारी अडीच च्या दरम्यान तालुक्यातील काळेगाव येथील भोगावती नदीपात्रामध्ये अज्ञात इसम शासनाचा कोणताही परवाना नसताना, पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे माहीत असून सुद्धा स्वतःच्या फायद्या करतात चोरून वाळू भरत होता तहसीलदार यांची पथक येत आहे, याची चाहूल लागताच त्याच्या ताब्यातील ट्रॉली भरलेल्या जागीच सोडून कामगारांसह ट्रॅक्टर घेऊन पळाला आहे. सर्कल अधिकारी विठ्ठल मेकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाळू चोरावर वाधवी कलम ३८९ व पर्यावरण अधिनियम १५ व ९ प्रमाणे वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments