"कर्जबाजारी किरकोळ व्यापारी" डबघाईला - अध्यक्ष पवन कोठारी



     
सध्या लाखो रुपये पगार असणाऱ्या वर्गातील लोक म्हातार पणाचा आधार म्हणून पेन्शन मागत आहेत. ( कदाचित आजची बचत उद्याचा आधार हे त्यांना माहीत नसावे ) तर दुसरीकडे शेती मालाचा भाव हा गंभीर प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. पण या सगळ्या घडामोडी मध्ये असंघटित सामान्य वर्ग व किरकोळ व्यापाऱ्यांचे काय ? 
    
 मार्च महिना अखेर असल्यामुळे या वर्गातील लोकांचे प्रचंड हाल सध्या सुरू असल्याचे पहायला आपल्याला सर्वत्र मिळत असेल. कुठलाही आधार न मिळाल्याने हा वर्ग कर्जबाजारी होत चालला आहे. सरकारी बँकेत कधीच उभे न राहू दिल्याने सामान्य वर्गातील लोक , किरकोळ व्यापारी फायनान्स कंपन्या च्या जाळ्यात अडकले आहेत. या मुळे आपण पाहिले तर आपल्या परिसरातील अनेक छोटे व्यापारी आर्थिक अडचणीत असल्याचे आपल्याला दिसून येईल. फायनान्स कंपन्यांची जुलमी वसुली मुळे , मानसिक त्रास होत असल्याने , कुठूनही आर्थिक आधार मिळत नसल्याने अनेक किरकोळ व्यापारी व्यसनाधीन होत चालले आहेत. 
      
      
हे आहेत किरकोळ व्यापारी अडचणीत येण्याचे कारणे .....
१."असंघटित असल्यामुळे अनेक योजना पासून दूर राहिला"
२.संघटन नसल्यामुळे मुळे राज्य शासन व केंद्र शासन यांच्या कडून दुर्लक्ष
३.सरकारी , नॅशनल बँक मध्ये कर्ज न मिळाल्याने अधिक व्याज व दंड असलेल्या फायनान्स कंपन्या मधून कर्ज घेतल्याने अधिक आर्थिक नुकसान
४. इतर वर्ग प्रमाणे कुठलाच महागाई भत्ता मिळत नसल्याने महागाई प्रचंड पण उत्पन्नात घट झाल्यामुळे अधिक आर्थिक परिस्थिती ढासळली.

किरकोळ व्यापारी , सामान्य वर्गातील लोकांची आर्थिक अडचण अशी कमी होऊ शकते...
१.प्रथमतः असंघटित कडून संघटित कडे प्रवास करावा लागेल.
२.सध्याच्या युगात संघटित वर्गाची ताकद आपण पाहत आहोत.
३.सरकारी , नॅशनल बँकेतून कर्ज पुरवठा झाला तर नक्की याचा फायदा या वर्गातील लोकांना होईल.
४.बँक मधून कर्ज पुरवठा करताना काही जाचक अटी या वर्गातील लोकांसाठी शिथिल करण्यात याव्यात.
५.मुद्रा कर्ज योजने चा लाभ जास्तीत जास्त या वर्गातील लोकांना व्हावा परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळे..

किरकोळ व्यापारी कल्याणकारी संस्था , महाराष्ट्र राज्य , ( रजि नं - महा/३३९/२०१९ )
अध्यक्ष श्री पवन कोठारी
मो नं - ९९ २३ ७५९ ९५९

Post a Comment

0 Comments