महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे - सुवर्णाताई शिवपुरे

 बार्शी |
 
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकांनी आपले आरोग्य जपले पाहिजे .खासकरून महिलांनी आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आसून यासाठी  आरोग्य शिबीर राबविणे स्तुत्य उपक्रम व आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला अघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई शिवपुरे यांनी केले.                                  
         
गुळपोळी येथे श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय व नेहरु युवती मंडळ च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.                                       
         
सदरच्या कार्यक्रमात पुढे बोलताना सुवर्णाताई असे म्हणाल्या कि महिलांना सर्व कामे  मल्टी टास्क, सर्व आघाड्यांवर शारीरिक कष्टप्रद कामं करावी लागतात म्हणून सर्व महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे म्हणाल्या.
         
आरोग्य शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई शिवपुरे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ शुभांगी अमोल नरखडे व प्रमुख उपस्थिती महेश मचाले ,अमोल नरखडे, बाळासाहेब देशमुख, अमर चिकणे,परमेश्वर पाटील,उषा माळी,व सत्य साई चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख सुधिर आणवेकर ,व ट्रस्ट च्या वतिने सर्व नागरिकांची मोफत तपासणी,व मोफत औषध उपचार करण्यात आले डाॅ,व पदआधीकारी उपस्थित होत गुळपोळीतील व परीसरातील बहुसंख्य नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला सर्वांचे आभार मंडळाच्या अध्यक्षा रेखा सूर्यकांत चिकणे यांनी मानले व आरोग्य शिबीरात चहा नाषट्याची  सेवा सूर्यकांत चिकणे यांचे वतीने करण्यात आली होती

Post a Comment

0 Comments