वैरागजवळ मोटासायकल अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी


बार्शी |

मोटारसायकलवरील अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी झाला आहे. सदर घटना वैराग - उस्मानाबाद रोडवरील फॉरेस्टच्या वळणावर सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. सतीश पाटील यांनी माहिती दिल्याने वैराग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

निलेश विलास पाटील (वय २२) रा. निंबळक ता.बार्शी  हे औषध - गोळ्या आणण्यासाठी वैरागला तो सोबत मित्र रविकिरण आण्णासाहेब पाटील (वय २६ ) याला घेऊन निंबळक वरून  सकाळी ९ वाजता निघाला होता. दरम्यान उस्मानाबाद -वैराग रोडवर वैराग जवळील फॉरेस्ट  असणाऱ्या वळणावर त्याचा मोटारसायकलवरील ( एम एच १३ ए व्हि ०५३७ ) ताबा सुटून तो खड्ड्यात जोरात पडून डोक्याला  गंभीर मार लागल्याने  निलेशचा जागीच मुत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला रविकिरण पाटील  जखमी झाला आहे.

त्यास वैराग येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. मयताची  माहिती चुलते सतीश जनार्दन पाटील यांनी वैराग पोलिसात दिल्याने आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
वैराग -उस्मानाबाद रोडवरील रातंजन ते वैराग दरम्यान असणाऱ्या फॉरेस्ट जवळ चढ -उतार तीव्र असून  बाहय वळने असल्याने या ठिकाणी आजपर्यंत अनेक अपघात होत आहेत. बांधकाम खात्याने या ठिकाणी सूचनाफलक लावण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments